आमच्याबद्दल
एक शेतकरी, अनेक प्रेरणा!
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून श्री. नितीन ज्ञानदेव भुजबळ हे एक प्रयोगशील आणि दूरदृष्टी असलेले सेंद्रिय शेतकरी आहेत. त्यांनी पारंपरिक शेतीच्या मर्यादा ओळखून सेंद्रियतेचा स्वीकार केला आणि स्वतःची शेती एक प्रयोगशाळा बनवली. लेखक, मार्गदर्शक आणि रामा अॅग्रोटेकचे बिझनेस हेड म्हणून ते शेतीत नवचैतन्य आणत आहेत. त्यांच्या कार्याची दखल देश-विदेशात घेतली जात आहे.
- १५+ वर्षांचा अनुभव
- शेती पुरस्कर्ता व प्रोत्साहन
- सखोल मृदा संवर्धन अभ्यास
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त
श्री. नितीन ज्ञानदेव भुजबळ – शेतकऱ्यांचा खरा सखा
मागील १7 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रत्येक चढ-उतारांचा अनुभव घेत, नितीन भुजबळ हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे दुःख, आर्थिक अडचणी आणि त्यांच्या कष्टांची किंमत न मिळणं – या साऱ्या गोष्टींचा त्यांनी जवळून अभ्यास केला आहे.
त्यांना जेव्हा जाणवले की आपल्या शेतकरी भावाला त्याच्या कष्टाच्या मोबदल्यात समाधान मिळत नाही, तेव्हा त्यांनी ठरवलं की काहीतरी वेगळं करायला हवं. त्यातूनच त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्धार केला. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आहे, हे त्यांनी हेरलं आणि सेंद्रिय शेतीद्वारे अधिक उत्पन्नाचा पर्याय उभा करण्याचा मार्ग त्यांनी निवडला.
नवीन शेतीचे नियोजन, शाश्वत शेतीच्या संकल्पना, आणि कमी खर्चात अधिक उत्पादन यावर भर देत, नितीन भुजबळ हे सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं काम करीत आहेत. त्यांचे ध्येय एकच – शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणं आणि त्यांच्या मेहनतीला न्याय देणं.
“मी आपल्या साठी नेहमीच उपलब्ध आहे” हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्यच शेतकऱ्यांना समर्पित आहे.
कौशल्य क्षेत्र
- सेंद्रिय शेती मार्गदर्शन : शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सेंद्रिय प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करणे.
- पीक सल्ला व मार्गदर्शन : पीक फेरपालट, आंतरपीक आणि हंगामी बदलांसाठी धोरणात्मक नियोजन.
- मृदा संवर्धन मार्गदर्शन : क्षीण झालेली माती पुनर्संचयित करण्यासाठी आणि तिची रचना आणि सुपीकता सुधारण्यासाठी तंत्रे.
- शेती उपयोगी संसाधने मार्गदर्शन : शेतांसाठी मोठ्या प्रमाणात कंपोस्टिंग प्रणालींची रचना आणि अंमलबजावणी.
- खते व औषधे सल्ला व मार्गदर्शन : कीटक आणि रोगांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी जैविक आणि सांस्कृतिक पद्धती.
- शेती प्रशिक्षण : शेतकरी आणि कृषी कामगारांसाठी शैक्षणिक कार्यशाळा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम.
